जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा

By Admin | Updated: May 1, 2017 02:05 IST2017-05-01T02:05:49+5:302017-05-01T02:05:59+5:30

नाशिक : शहरासह जिल्ह्यातील बागलाण, निफाड व देवळा तालुक्यातील गावांना रविवारी गारपीटसह अवकाळी पावसाने झोडपले.

In the district, there is an underworld | जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा

जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा

जिल्ह्यात अवकाळीचा तडाखानाशिक : शहरासह जिल्ह्यातील बागलाण, निफाड व देवळा तालुक्यातील गावांना रविवारी गारपीटसह अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे कांदा, डाळिंब, टमाट्यासह अन्य पिकांचे नुकसान होऊन लाखोंची हानी झाली आहे. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळ येऊन गारांच्या पावसाने झोडपले. गारपिटीमुळे कांदा, आंबा, डाळिंब पिकांचे नुकसान झाले.

शहर परिसरात रिमझिम

शहरातील अनेक भागांत पावसाच्या सरी बरसल्या. शहरालगतच्या ग्रामीण भागांमध्ये गारांचा पाऊस झाला. शालिमार, द्वारका, इंदिरानगर, उपनगरात पाऊस झाला. सिद्धपिंप्री, चितेगाव, मखमलाबाद, भगूर या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला.

Web Title: In the district, there is an underworld

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.