जिल्ह्यात दहा पंचायत समित्यांवर आघाडीचा झेंडा सेना-भाजपाला प्रत्येकी दोन, तर माकपला एक जागा

By Admin | Updated: September 15, 2014 00:32 IST2014-09-14T22:53:46+5:302014-09-15T00:32:27+5:30

जिल्ह्यात दहा पंचायत समित्यांवर आघाडीचा झेंडा सेना-भाजपाला प्रत्येकी दोन, तर माकपला एक जागा

In the district, there are two seats each for the Sena-BJP and the CPI (M) one seat | जिल्ह्यात दहा पंचायत समित्यांवर आघाडीचा झेंडा सेना-भाजपाला प्रत्येकी दोन, तर माकपला एक जागा

जिल्ह्यात दहा पंचायत समित्यांवर आघाडीचा झेंडा सेना-भाजपाला प्रत्येकी दोन, तर माकपला एक जागा



नाशिक : जिल्ह्यात पंधरा पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतिपदासाठी रविवारी (दि. १४) निवडणूक होऊन त्यात पंधरापैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचे व चार जागांवर कॉँग्रेसचे सभापती, तर सेना व भाजपाचे प्रत्येकी दोन जागांवर आणि सुरगाणा पंचायत समितीवर माकपच्या उमेदवाराची निवड झाली आहे. यात आरक्षणामुळे आधीच नाशिक, नांदगाव व येवला पंचायत समितीत सभापतींची बिनविरोध निवड होणार हे जवळपास निश्चित झाले होते.
जिल्'ातील पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदी निवड झालेल्या सदस्यांची नावे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे (कंसात त्या-त्या सदस्यांचा पक्ष) : येवला- सभापती- प्रकाश वाघ (राष्ट्रवादी), उपसभापती- जयश्री बावचे (राष्ट्रवादी), नांदगाव- सभापती- कमल सोनवणे (कॉँग्रेस), उपसभापती- सुरक्षा केशर (राष्ट्रवादी), मालेगाव- सभापती- अण्णा पवार (शिवसेना) उपसभापती- अनिता अहिरे(राष्ट्रवादी), चांदवड- सभापती- अनिता जाधव (राष्ट्रवादी), उपसभापती- मनीषा जाधव (राष्ट्रवादी), देवळा- सभापती- केदा शिरसाट (भाजपा), उपसभापती- कुसुमताई अहिरे (अपक्ष), बागलाण- सभापती- जिजाबाई सोनवणे (भाजपा), उपसभापती- वसंत भामरे (राष्ट्रवादी), कळवण- सभापती- संगीता ठाकरे (राष्ट्रवादी), उपसभापती- अ‍ॅड. संजय पवार (राष्ट्रवादी), सुरगाणा- सभापती- उत्तम कडू (माकप), उपसभापती- मोहन गांगुर्डे (शिवसेना), पेठ- सभापती- जयश्री वाघमारे (शिवसेना), उपसभापती- महेश
टोपले (मनसे), (पान २ वर)

दिंडोरी- सभापती- अलका चौधरी (राष्ट्रवादी), उपसभापती- छाया डोखळे (शिवसेना), त्र्यंबकेश्वर- सभापती- गणपत वाघ (कॉँग्रेस), उपसभापती- शांताराम मुळाणे (कॉँग्रेस), निफाड- सभापती- सुभाष कराड (राष्ट्रवादी), उपसभापती- राहुल बनकर (कॉँग्रेस), सिन्नर- सभापती- संगीता काटे (कॉँग्रेस), उपसभापती- राजेंद्र घुमरे (कॉँग्रेस), इगतपुरी- सभापती- गोपाळ लहांगे (कॉँग्रेस), उपसभापती- पांडुरंग वारुंगसे (राष्ट्रवादी), नाशिक- सभापती- मंदाबाई निकम (राष्ट्रवादी), उपसभापती- अनिल ढिकले (शिवसेना) यानुसार निवड झाली आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: In the district, there are two seats each for the Sena-BJP and the CPI (M) one seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.