यशराज खाडेच्या नेतृत्वाखालील नाशिकचा जिल्हा संघ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:26 IST2021-03-04T04:26:30+5:302021-03-04T04:26:30+5:30
नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एमसीएतर्फे धुळे व शिरपूर येथे आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या विभागीय साखळी स्पर्धेसाठी, ...

यशराज खाडेच्या नेतृत्वाखालील नाशिकचा जिल्हा संघ जाहीर
नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एमसीएतर्फे धुळे व शिरपूर येथे आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या विभागीय साखळी स्पर्धेसाठी, नाशिकचा जिल्हा क्रिकेट संघ रवाना झाला आहे. नाशिकचा समावेश असलेल्या उत्तर विभागात धुळे, जळगाव व नंदुरबार हे इतर तीन संघ आहेत. ३ ते ६ मार्च दरम्यान सदर संघांमध्ये ५० षटकांचे एक दिवसीय साखळी सामने खेळविण्यात येणार आहेत. नाशिकचा पहिला सामना ३ मार्च रोजी, धुळे संघाबरोबर धुळे येथे होणार आहे. त्यासाठी नाशिकचा जिल्हा क्रिकेटचा १४ जणांचा चमु संघ प्रशिक्षक व व्यवस्थापक शांताराम मेणे यांच्यासह धुळे येथे रवाना झाला आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट निवड समितीचे तरुण गुप्ता, सतीश गायकवाड व शिवाजी जाधव यांनी शनिवार, २७ फेब्रुवारीपासून विविध टप्प्यांत पार पडलेल्या निवड चाचणी प्रक्रियेनंतर सदर निवड घोषित केली.
इन्फो
नाशिकचा जिल्हा क्रिकेट संघ
स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या संघाच्या कर्णधारपदी यशराज खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शर्विन किसवे, स्वप्नील शिंदे , सौरभ वाणी, ओम घाडगे, मुस्तांसिर कांचवाला,आदित्य लढ्ढा, रवींद्र मछ्या, गुरवीरसिंग सैनी, प्रतीक तिवारी, रितेश तिडके, हृषीकेश कातकाडे, अभिषेक जंगम व गुरमानसिंग रेणु.