जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:25 IST2020-01-24T22:13:59+5:302020-01-25T00:25:58+5:30
मालेगावी मौलाना मुक्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस्मध्ये आयोजित ४५वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव होते.

मालेगावी झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पारितोषिक प्राप्त बाल वैज्ञानिकांसमवेत आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, राशीद मुक्तार, प्राचार्य डॉ. ए. के. कुरेशी, नितीन बच्छाव, आर. डी. निकम आदी.
संगमेश्वर : मालेगावी मौलाना मुक्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस्मध्ये आयोजित ४५वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव होते.
आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, जामिया मोहंमदिया शिक्षण संस्थेचे सचिव रशीद मुक्तार, प्राचार्य डॉ. ए.के. कुरैशी, बी.टी. चव्हाण, प्रवीण पाटील, गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी, डी.यू. अहिरे आदी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यास बक्षिसाचे वितरण करण्यात आले. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आमदार मुफ्ती मोहंमद यांनी आयोजकांचे कौतुक
केले. नवनवीन वैज्ञानिक तयार करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान शिकणे महत्त्वाचे असल्याचे बच्छाव यांनी सांगितले.
स्पर्धेचा निकाल असा माध्यमिक गटात विवेक पाटील, खेडगाव, ता. दिंडोरी व साहिल लोहितकर प्रथम, बालाजी दिघोळे, नायगाव, ता. सिन्नर, द्वितीय, नीरज जाधव व सुहास झरे, सिम्बॉयसीस, नाशिक यांना तृतीय यांच्या उपकरणांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
प्रयोगशाळा परिचर गटात एकनाथ आहेर, नाशिक प्रथम, संतोष खैरनार, त्र्यंबकेश्वर, द्वितीय
तर कलीम जुनैद, मालेगाव याने तृतीय क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून पी. आर. करपे, वाय. डी. पगार, ए. एस.
जोशी, एस.आर. हिरे, माधुरी
नहिरे, रूपाली पाटील, डी. के.
निकम, महेश बागड, अमिन
सय्यद, एवस शहा, याकुब अन्सारी, रोहिणी हरिदास, नुरूल अमिन. यांनी काम पाहिले.
प्राथमिक गटात : महाशक्ती दिघोळे, नायगाव, ता. सिन्नर यास प्रथम, पल्लवी डगळ व प्रियंका बिरारी, ब्राह्मणगाव, ता. बागलाण यांना द्वितीय, सिद्धेश ढिकळे व आदित्य ढिकळे, सय्यद पिंप्री, ता. नाशिक तृतीय तर अमित गडाख, देवपूर यांच्या उपकरणांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
४आदिवासी माध्यमिक विद्यार्थी गटात : पी. एस. भामरे, पिंपळद, ता. नाशिक यास प्रथम, सुरेश गांगुर्डे व गणेश गायकवाड, बाभुळणे, ता. बागलाण यांना द्वितीय, मंगेश कासार व मयूर गायकवाड, मानूर, ता.कळवण याच्या उपकरणांना तृतीय क्रमांक मिळाला. आदिवासी प्राथमिक विद्यार्थी गटात व्ही. टी. सोनवणे, मुंढेगाव, ता. इगतपूरी, यास : प्रथम, नंदलाल अहिरे, पिंपळगाव यास द्वितीय, यशवंत देशमुख, सुरगाणा यांच्या उपकरणास तृतीय क्रमांक मिळाला.