जिल्हा बॅँकेच्या उपविभागीय कार्यालयाला टाळे

By Admin | Updated: April 10, 2017 01:03 IST2017-04-10T01:03:42+5:302017-04-10T01:03:57+5:30

सटाणा : विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संचालक मंडळांनी शुक्रवारी येथील जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयासह सटाणा शाखेला टाळे ठोकले.

The District Office of the Sub-Divisional Office | जिल्हा बॅँकेच्या उपविभागीय कार्यालयाला टाळे

जिल्हा बॅँकेच्या उपविभागीय कार्यालयाला टाळे

 सटाणा : ३१ मार्चच्या आत थकीत कर्ज भरल्यास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नव्याने कर्ज देऊ, असे लेखी आश्वासन देऊनही कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात घोषणाबाजी करत सटाणा शहरासह परिसरातील गावांच्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संचालक मंडळांनी शुक्रवारी येथील जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयासह सटाणा शाखेला टाळे ठोकले.
जोपर्यंत जिल्हा बँकेचे संचालक येथे येणार नाहीत तोपर्यंत कुलूप उघडणार नाही असा पवित्रा घेतल्याने अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यावेळी संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन नरेंद्र दराडे यांचाही जोरदार घोषणाबाजीने निषेध केला . अहिरे यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने आंदोलनकर्त्यांनी जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयाला व सटाणा शाखेला टाळे ठोकले. बँकेचे संचालक सचिन सावंत येथे येऊन आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत टाळे न उघडण्याचा निर्णय झाला. सावंत यांचा फोनवरूनही संपर्क होऊ न शकल्याने १० तारखेपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्याने टाळे दोन तासांनी उघडण्यात आले.
आंदोलनात राजेंद्र सोनवणे, राहुल सोनवणे, दोधा मोरे, सुभाष सोनवणे, राजेंद्र गायकवाड, विशाल सोनवणे, पांडुरंग सोनवणे, भिका सोनवणे, भास्कर सोनवणे, दौलत सोनवणे, अशोक सोनवणे, रमेश खैरनार, केवळ जाधव, शरद सोनवणे, यशवंत खैरनार, नारायण बच्छाव, अशोक सोनवणे आदिंसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: The District Office of the Sub-Divisional Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.