जिल्हास्तरीय टपाल तिकीट प्रदर्शन

By Admin | Updated: December 4, 2014 00:19 IST2014-12-04T00:19:17+5:302014-12-04T00:19:51+5:30

जिल्हास्तरीय टपाल तिकीट प्रदर्शन

District level postal performance | जिल्हास्तरीय टपाल तिकीट प्रदर्शन

जिल्हास्तरीय टपाल तिकीट प्रदर्शन

नाशिक : मालेगाव डाक विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय टपाल तिकीट प्रदर्शन दि. ९ व १० डिसेंबर रोजी सोयगाव येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, यामध्ये जिल्ह्यातील तिकीट संग्राहक सहभागी होणार आहेत.
प्रदर्शन कालावधीत प्रश्नमंजूषा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकला स्पर्धेसाठी ‘स्वच्छ भारत’ हा विषय ठेवण्यात आला आहे. याशिवाय ‘माय स्टॅम्प’ ही संकल्पनाही राबविण्यात येणार असून, प्रत्येकाला आपले छायाचित्र टपाल तिकिटावर छापता येणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मालेगाव डाक विभागाचे अधीक्षक एल. व्ही. सूर्यवंशी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: District level postal performance