जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत र. ज. गर्ल्स हायस्कूल प्रथम
By Admin | Updated: March 24, 2015 23:26 IST2015-03-24T23:25:48+5:302015-03-24T23:26:03+5:30
जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत र. ज. गर्ल्स हायस्कूल प्रथम

जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत र. ज. गर्ल्स हायस्कूल प्रथम
जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत र. ज. गर्ल्स हायस्कूल प्रथम
नाशिक : नाशिक जिल्हा डान्स स्पोर्ट्स नाशिकच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समूह नृत्य स्पर्धेत नाशिकरोड येथील र. ज. चौहाण (बिटको) गर्ल्स हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला. अमरावती येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सात मुली या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. मानसी डबे, मानसी बोराडे, श्रेया पिसोळकर, मानसी देशमुख, मानसी गोसावी, समृद्धी जोशी, स्रेहल हावले यांनी सुवर्णपदक पटकाविले. यावेळी अविनाश टिळे, जागृती टिळे, प्रद्युम्न जोशी, संजय पाटील, प्रदीप गोराडे, मुग्धा कुलकर्णी, घुगे, धामणे, शारदा गोसावी यांनी कौतुक केले.