जिल्हास्तरीय मुलींच्या उद्या रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धा
By Admin | Updated: July 15, 2014 00:46 IST2014-07-14T23:06:59+5:302014-07-15T00:46:23+5:30
जिल्हास्तरीय मुलींच्या उद्या रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धा

जिल्हास्तरीय मुलींच्या उद्या रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धा
नाशिक : जिल्हास्तरीय सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर महिला गटाच्या रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धा बुधवारी (दि़ १६) होणार असल्याची माहिती जिल्हा रस्सीखेच असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर टर्ले यांनी दिली़ छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सकाळी ९ वाजता या स्पर्धांना प्रारंभ होणार आहे़ सब ज्युनिअर मुलींच्या स्पर्धा ४०० व ४२० किलोग्रॅम या वजनगटात होणार आहेत़ ज्युनिअर मुलींची स्पर्धा ४६० किलोगॅ्रम, तर सिनिअर महिला स्पर्धा ४८० किलोगॅ्रम गटात होणार आहेत़ या स्पर्धेतून निवडला जाणारा संघ २५ जुलै रोजी संगमनेर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्ह्णाचे नेतृत्व करणार आहे़ या स्पर्धेत अधिकाधिक संघांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन संजय पाटील, स्वप्नील करपे यांनी केले आहे़ ’कोलंबो : श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याने घरच्या मैदानावर द. आफ्रिका-पाकिस्तान मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे़