जिल्हा स्पर्धेवर नाशिक, सुरगाण्याचे वर्चस्व जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा

By Admin | Updated: November 10, 2014 23:46 IST2014-11-10T23:45:48+5:302014-11-10T23:46:29+5:30

नाशिक, सुरगाण्याचे वर्चस्व जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा

District level competition in Nashik, Surgana District level school ground competition | जिल्हा स्पर्धेवर नाशिक, सुरगाण्याचे वर्चस्व जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा

जिल्हा स्पर्धेवर नाशिक, सुरगाण्याचे वर्चस्व जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा

 नाशिक : आज झालेल्या ग्रामीण विभागाच्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत नाशिक तसेच सुरगाणा तालुक्याच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले़ मुले तसेच मुलींच्या गटाच्या १५ प्रकारच्या मैदानी स्पर्धा आज झाल्या़ छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे या स्पर्धा सुरू असून, महापालिका गटाच्या स्पर्धांनंतर आता ग्रामीण गटाच्या स्पर्धांना सुरुवात झाली आहे़ मुलांच्या गटात नाशिक तसेच सुरगाण्याच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले, तर मुलींच्या गटात नाशिक तसेच निफाड तालुक्याने निर्विवाद वर्चस्व राखले़ विविध स्पर्धेतील विजेते व उपविजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे- १०० मीटर धावणे - १४ वर्षे मुले - इशान भांडे (नाशिक), जयेश शिंदे (नाशिक )़ मुली- नलिनी अहिरे (नाशिक), मीना राऊत (सुरगाणा)़ १७ वर्षे गट मुले- विष्णू गंभाडे (सुरगाणा), सोहिल शेख (नाशिक)़मुली- सृष्टी दशपुते (नाशिक), वैष्णवी पानसरे (नाशिक)़ १९ वर्षे गट मुले- दीपक मिश्रा (नाशिक), दिगंबर बागुल (त्र्यंबक) ़ मुली- करिना घडवजे (नाशिक), अर्चना चारोसकर (दिंडोरी)़ ६०० मीटर - १४ वर्षे मुले- बलराज सिंग (नाशिक), चंद्रकांत दिघे (सुरगाणा)़ मुली- काजल दळवी (त्र्यंबक), लक्ष्मी कातकरी (पेठ)़ ८०० मीटर - १७ वर्षे मुले- प्रतीक कातकडे (नाशिक), मनप्रसाद गुरूंग (नाशिक)़ मुली- सोनी गायकवाड (दिंडोरी), सपना अहेर (येवला)़ १९ वर्षे मुले- नितीन चव्हाण (सुरगाणा), हेमराज पावरा (सुरगाणा)़ मुली- साधना बांगरे (नाशिक), मनीषा खांडोले (सुरगाणा) ़

Web Title: District level competition in Nashik, Surgana District level school ground competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.