वृक्षलागवडीची जिल्हास्तरीय समितीकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:14 IST2020-12-22T04:14:45+5:302020-12-22T04:14:45+5:30
सन २०१६ ते २०१९ दरम्यान शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे एकलहरे वीज केंद्र प्रशासनाने औष्णिक वीज केंद्र व रहिवासी वसाहतीतील ...

वृक्षलागवडीची जिल्हास्तरीय समितीकडून पाहणी
सन २०१६ ते २०१९ दरम्यान शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे एकलहरे वीज केंद्र प्रशासनाने औष्णिक वीज केंद्र व रहिवासी वसाहतीतील मोकळ्या जागेत भरघोस वृक्षारोपण करून शंभर टक्के झाडे जगविली आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी ५० कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत लावलेल्या रोपांचे संवर्धन व संरक्षण करण्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना झालेली होती. नाशिक औष्णिक विद्युत केंद्राकरिता १५ हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. याप्रमाणे लागवड केलेल्या रोपांची पाहणी करण्याकरिता जिल्हास्तरीय समितीचा दौरा नुकताच नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे येथे झाला. या समितीचे अध्यक्ष एन.बी. मुंडावरे, सी. डी. भारमल व श्वेता ढोमू, आमले, काकडे, गिते, वाघ उपस्थित होते. नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे स्थापत्य विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता खताळ, वेदपाठक यांनी सन २०१७ पासून ते आजपावेतो विविध ठिकाणी लागवड केलेल्या वृक्षारोपणाची स्थळनिहाय माहिती जिल्हास्तरीय समितीच्या अधिकाऱ्यांना दिली. जिवंत रोपांची संख्या ही शंभर टक्के असून, त्यांची उंची समाधानकारक असल्याचे उपरोक्त समितीस आढळून आले. (फोटो २१ झाडे)