जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा उत्साहात
By Admin | Updated: September 4, 2015 23:44 IST2015-09-04T23:43:03+5:302015-09-04T23:44:06+5:30
जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा उत्साहात

जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा उत्साहात
इंदिरानगर : येथील डे केअर सेंटर शाळेत बालमनाचे अंतरंग उलगडणारी जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा उत्साहात झाली. ४५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. बालकवी स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी अशा तीन गटात घेण्यात आली. प्रथम ऋतू पाठक (शिशुविहार बालमंदिर), द्वितीय स्वानंद पारखी (डे केअर सेंटर), तृतीय गायत्री वाणी (डे केअर सेंटर), इयत्ता ८ ते १० वीत प्रथम गायत्री वडघुले, द्वितीय अक्षदा देशपांडे (सारडा कन्या विद्यालय), तृतीय पायल तासकर (वैनतेय विद्यालय निफाड), इयत्ता ११ ते १२ वीत प्रथम नेहा देवरे (डे केअर महाविद्याय), द्वितीय आरती बागुल (के. एन. के. महाविद्यालय) तसेच काव्यवाचन स्पर्धेत इयत्ता ३री ते ४थीत साहिल भोसले (प्राथमिक विद्यालय उंटवाडी), द्वितीय सारिका टिळे (नगरकर गुरुकुल), नूपुर देवरे (नगरकर गुरुकुल), इयत्ता ५वी ते ७वीत वैष्णवी टिळे (नगरकर गुरुकुल), द्वितीय स्वानंद पारखी (डे केअर सेंटर), तृतीय श्रावणी उकिडवे (डे केअर सेंटर), इयत्ता ८वी ते १०वीत प्रथम अथर्व कुलकर्णी (पेठे विद्यालय), ऋतिका नकली (पेठे विद्यालय), गायत्री वडघुले (वैनतेय विद्यालय), इयत्ता ११ वी ते १२ वीत प्रथम प्रणाली नाईक (एच.पी.टी. महाविद्यालय), राहुल वानखेडे (डे केअर सेंटर), तृतीय सविता पाटोळे, (एच.पी.टी. महाविद्यालय) आदि विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गौरविण्यात आले.
व्यासपीठावर उद्धव कानडे, पुरुषोत्तम सदाफुले, अॅड. ल.जि. उगावकर, गोपाळ पाटील, अजय ब्रह्मेचा, जयंत ठोमरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा पाठक, सुगंधा साळवे यांनी केले.
पूनम सोनवणे यांनी आभार
मानले. (प्रतिनिधी)