शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

जिल्हा बॅँक-जिल्हा प्रशासनात तू तू-मैं मैं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 01:52 IST

थकबाकी वसुलीपोटी शेतकऱ्यांच्या जमिनींवर अगोदरच विविध कार्यकारी सोसायट्यांनी बोजा चढविलेला असताना पुन्हा त्यावर जिल्हा बॅँकेचे नाव लावून शेतकºयांना अडचणीत आणणे, शासनाने दिलेल्या दुष्काळी मदतीची रक्कम बॅँकेने अनामत म्हणून जमा करून घेणे यांसह शेतकºयांशी संबंधित अनेक प्रश्नांवर होत असलेल्या तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन व बॅँक व्यवस्थापनाच्या झालेल्या बैठकीत तू तू-मैं मंै झाली. शेतकºयांचे पैसे अडकविल्यास बॅँकेच्या कर्मचाºयांना निलंबित करण्याचा इशारा प्रशासनाने देताच, बॅँकेच्या अध्यक्षांनीदेखील राजीनामा देण्याची भाषा करून शासनाकडून प्रशासकाची नेमणूक करून आणण्याची तयारी दर्शविली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या जमिनींची जप्ती : अध्यक्षांचा राजीनाम्याचा इशारा

नाशिक : थकबाकी वसुलीपोटी शेतकऱ्यांच्या जमिनींवर अगोदरच विविध कार्यकारी सोसायट्यांनी बोजा चढविलेला असताना पुन्हा त्यावर जिल्हा बॅँकेचे नाव लावून शेतकºयांना अडचणीत आणणे, शासनाने दिलेल्या दुष्काळी मदतीची रक्कम बॅँकेने अनामत म्हणून जमा करून घेणे यांसह शेतकºयांशी संबंधित अनेक प्रश्नांवर होत असलेल्या तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन व बॅँक व्यवस्थापनाच्या झालेल्या बैठकीत तू तू-मैं मंै झाली. शेतकºयांचे पैसे अडकविल्यास बॅँकेच्या कर्मचाºयांना निलंबित करण्याचा इशारा प्रशासनाने देताच, बॅँकेच्या अध्यक्षांनीदेखील राजीनामा देण्याची भाषा करून शासनाकडून प्रशासकाची नेमणूक करून आणण्याची तयारी दर्शविली.जिल्हा बॅँकेने थकबाकी दारांविरुद्ध कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्तेवर बोजा चढविणे, प्रसंगी लिलाव करून वसुली करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर थकबाकीदारांचे अन्य बॅँकेत असलेले खातेदेखील सील करण्याची कार्यवाही सुरू आहे. शासनाने शेतकºयांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा केले. (पान १० वर)(पान १ वरून)त्यातील काही रक्कम बॅँकेने परस्पर जमा करून घेण्यास सुरुवात केली आहे.बॅँकेच्या या सर्व कार्यवाहीच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन बॅँकेच्या जुलमी कारवाईविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या दालनात जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर, कार्यकारी संचालक सतीश खरे यांची बैठक घेण्यात आली. यावेळी खेडकर यांनी शेतकºयांच्या सातबारा उताºयावर बॅँकेचा बोझा कशाच्या आधारे चढविला जातो, अशी विचारणा केली. जर विकासो संस्थेने शेतकºयाची जमीन तारण घेऊन कर्ज वितरण केले आहे व तसा करार केला आहे, तर बॅँकेचा थेट संबंध येतो कोठे, असा सवाल केला. त्यावर बॅँकेने सारवासारव करून, यापुढे तसे न करण्याची हमी दिली. त्याचबरोबर शेतकºयांच्या अनुदानाची रक्कम कशाच्या आधारे परस्पर बॅँक जमा कशी करून घेऊ शकते? सदर रक्कम शासनाची असून, तसे केल्यास बॅँकेच्या कर्मचाºयाला निलंबित करण्याची तंबी खेडकर यांनी दिली. जे धनाढ्य आहेत व कर्ज फेडत नाही अशा शेतकºयांवर बॅँकेने कारवाई करावी, परंतु सध्या दुष्काळाच्या परिस्थितीशी झगडणाºया गरीब शेतकºयाविषयी बॅँकेने नरमाई दाखवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात येऊन काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली.चौकट====शेतकºयांची कर्जफेडीची नाही मानसिकताबॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी, कर्जदार शेतकºयांची प्रशासनाने बाजू घेऊ नये, नाहीतर बॅँकेच्या ठेवीदारांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवू असे सांगून, बॅँकेत दररोज घेणेकरी येत असून, त्यांना पैसे देण्यासाठी वसुलीसाठी पर्याय नाही. प्रशासन जर सहकार्य करणार नसेल तर आपण राजीनामा देऊ व अन्य जिल्हा बॅँकांप्रमाणे नाशिक बॅँकेवर प्रशासकाची नेमणूक करून आणू, असा निर्वाणीचा इशारा दिला. कर्जदार शेतकºयांकडे पैसे असूनही त्यांची कर्जफेडीची मानसिकता नाही अशा शेतकºयांच्या विरोधात बॅँकेची कारवाई सुरूच राहील यावर ते ठाम राहिले.चौकट===६०० थकबाकीदारांवर कारवाई करणारजिल्हा बॅँकेने मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून, त्यात नाशिक व निफाड सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी संचालकांबरोबरच, आर्मस्ट्रॉँग कंपनीचे संचालक भुजबळ कुटुंबीयांचाही समावेश आहे. लवकरच या सर्वांच्या मालमत्ता जप्तीची प्रकिया सहकार विभागामार्फत सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बॅँकेचे माजी अध्यक्ष देवीदास पिंगळे यांच्या आनंद अ‍ॅग्रो कंपनीच्या मालमत्ता जप्तीवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याचेही बॅँक व्यवस्थापनाने सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्र