शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

जिल्हा रुग्णालय की मदिरालय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:15 AM

राज्यभरातील मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये गणना असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वाटचाल सद्यस्थितीत मदिरालयाकडे झाल्याचे चित्र दिसून येत आहे़

नाशिक : राज्यभरातील मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये गणना असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वाटचाल सद्यस्थितीत मदिरालयाकडे झाल्याचे चित्र दिसून येत आहे़ रुग्णालयात कर्तव्यावर असलेले वर्ग चारचे काही कर्मचारी हे मद्यधुंद अवस्थेत काम करीत असल्याची ओरड स्टाफ नर्सकडून केली जात आहे़ वर्ग चारसाठी रुग्णालय प्रशासनाने दिलेले लॉकर हे वस्तू ठेवण्यासाठी नव्हे तर मद्याच्या रिचवलेल्या बाटल्या ठेवण्यासाठी दिलेत की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच स्वच्छता निरीक्षकांना हा सर्व प्रकार माहीत असूनही याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली जात असल्याचे चित्र आहे़  नाशिक जिल्हाच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्वसामान्य तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या नागरिकांसाठी जिल्हा रुग्णालय हा एकमेव आधार आहे़आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा रुग्णालय हा एकमेव पर्याय शिल्लक असतो़ मात्र, याठिकाणी कामावर असलेले वर्ग चारचे काही कर्मचारी हे मद्यप्राशन करून कर्तव्यावर असतात़ विशेषत: रात्रपाळी करणाऱ्या कर्मचाºयांबाबत विचारायलाच नको अशी परिस्थिती आहे़  मेल सर्जिकल, मेल आर्थो, जळीत कक्ष, अपघात विभाग, इमर्जन्सी वार्ड, मनोरुग्ण विभाग, इन्फेक्शन वार्ड, ब्लड बँक या विभागांतील वर्ग चारचे काही कर्मचारी हे रात्रीच्या वेळी बिनदिक्कतपणे मद्यप्राशन करून कर्तव्यावर असतात़, तर मद्यप्राशनासाठी वर्ग चारच्या कर्मचाºयांना काही लॅब टेक्निशियन व डॉक्टरांचीही कंपनी मिळत असल्याची चर्चा आहे़स्वच्छता निरीक्षकांची मवाळ भूमिकाजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयांवर लक्ष ठेवण्यासाठी तीन कायमस्वरूपी, तर दोन कंत्राटी स्वच्छता निरीक्षक आहेत़ याबरोबरच कंत्राटी कर्मचाºयांवर लक्ष ठेवण्यासाठी तीन मुकादम व एक ओटी असिस्टंटही आहे़ मात्र, असे असूनही जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतेबाबत नागरिकांची ओरड कायम आहे़, तर दुसरीकडे मद्यपान करून कर्तव्य करणाºयांविरोधात कारवाई केली जात नसल्याने ते निर्ढावले आहेत़ जिल्हा रुग्णालयाच्या सर्व विभागांतील मद्यपान करणाºयांचे लॉकर तपासून साफसफाई मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे़

टॅग्स :hospitalहॉस्पिटल