भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा रुग्णालयाची टीम नेपाळ
By Admin | Updated: April 28, 2015 22:59 IST2015-04-28T22:51:36+5:302015-04-28T22:59:31+5:30
भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा रुग्णालयाची टीम नेपाळ

भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा रुग्णालयाची टीम नेपाळ
लानाशिक : आरोग्य महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा रुग्णालयातील आपत्ती व्यवस्थापनाची सहा लोकांची तुकडी नेपाळमधील जखमी नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी रवाना झाल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ गजानन होले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडले असून, अनेक गंभीर जखमी झाले आहेत़ या नैसर्गिक आपत्तीत गंभीर जखमी झालेल्या नागरिकांच्या शुश्रूषेसाठी जिल्हा रुग्णालयातील आपत्ती व्यवस्थापनाची सहा डॉक्टरांचे पथक नेपाळला रवाना झाले आहेत़ या पथकाचे नेतृत्व अस्थिरोगतज्ज्ञ डॉ़ सुनील शहा हे करीत आहेत़
जिल्हा रुग्णालयाने पाठविलेल्या या पथकामध्ये अस्थिरोगतज्ज्ञ डॉ़ जफार तडवी, फिजिशिअन डॉ़ भरत अहिरे, शल्यचिकित्सक डॉ़ भारत कुलकर्णी, भूलतज्ज्ञ डॉ़ सचिन पवार, फार्मासिस्ट डॉ़ रफिक काद्री, स्टाफ विशाल सोनार यांचा समावेश आहे़ सहा जणांची ही टीम सोमवारी सकाळी आठ वाजता मुंबई विमानतळावर पोहोचली़
नेपाळमध्ये जाऊन तेथील नागरिकांना या पथकामार्फत वैद्यकीय सेवा पुरविल्या जाणार आहेत़ (प्रतिनिधी)