जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्याधर कुलकर्णी यांना पदोन्नती

By Admin | Updated: May 27, 2014 01:04 IST2014-05-27T01:02:07+5:302014-05-27T01:04:39+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्याधर कुलकर्णी यांची मुंबईला पदोन्नतीवर बदली झाली आहे.

District Health Officer Dr. Pradhadra Kulkarni promotions | जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्याधर कुलकर्णी यांना पदोन्नती

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्याधर कुलकर्णी यांना पदोन्नती

नाशिक : जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्याधर कुलकर्णी यांची मुंबईला पदोन्नतीवर बदली झाली आहे.
तात्पुरत्या स्वरूपात ही पदोन्नती देण्यात आली असून, मुंबईच्या आरोग्य संचालक कार्यालयात आरोग्य उपसंचालक (नियोजन) पदावर डॉ. विद्याधर कुलकर्णी यांची वर्णी लागली आहे. दोन वर्षांपूर्वीच ६ जून २०१२ रोजी नाशिक जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली होती. येत्या ६ जूनला त्यांना दोन वर्षे पूर्ण होणार होती. तत्पूर्वीच त्यांची मुंबईला बदली झाली आहे. यापूर्वीही त्यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ८ ऑगस्ट २००४ ते ८ऑगस्ट २००८ या काळात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारीपदी काम केले होते. आता डॉ. कुलकर्णी यांच्या जागी धुळ्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांची नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: District Health Officer Dr. Pradhadra Kulkarni promotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.