जिल्ह्यासाठी साडेपाच हजार इव्हीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:11 IST2018-08-03T00:30:17+5:302018-08-03T01:11:14+5:30

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष एकीकडे युती, आघाडीची चर्चा करीत असताना दुसरीकडे निवडणूक यंत्रणेने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. जिल्ह्याला ५,४७९ नवीन मतदान यंत्रे मिळणार आहेत. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्याबरोबरच यंदा पहिल्यांदाच या निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात येणार असल्याने नाशिक जिल्ह्णासाठी ५,४७९ नवीन मतदान यंत्रे देण्यात आली

The district is divided into five thousand five thousand EVMs | जिल्ह्यासाठी साडेपाच हजार इव्हीएम

जिल्ह्यासाठी साडेपाच हजार इव्हीएम

ठळक मुद्देलोकसभेची तयारी : पहिल्यांदाच होणार ‘व्हीव्हीपॅट’चा वापर

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष एकीकडे युती, आघाडीची चर्चा करीत असताना दुसरीकडे निवडणूक यंत्रणेने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. जिल्ह्याला ५,४७९ नवीन मतदान यंत्रे मिळणार आहेत.
मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्याबरोबरच यंदा पहिल्यांदाच या निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात येणार असल्याने नाशिक जिल्ह्णासाठी ५,४७९ नवीन मतदान यंत्रे देण्यात आली
आहे. जिल्ह्याचे पथक यंत्रे घेण्यासाठी बेंगलोर येथे रवाना झाले आहे. देशपातळीवर लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची चर्चा होत असताना त्यास निवडणूक आयोगाने प्रतिकूलता दर्शविली असली तरी, सध्याचे तापलेले राजकीय वातावरण पाहता, लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक राजस्थान, मध्य प्रदेश आदी राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या बरोबरीने घेण्याची शक्यताही वर्तविली जात आहे तसे झाल्यास डिसेंबरअखेर या निवडणुका होतात की काय असे वाटू लागल्याने निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेगाने सुरुवात केली आहे. त्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्यात येत आहे. यादीत कृष्णधवल छायाचित्र असलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र गोळा करण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन त्यांची संपूर्ण अद्ययावत माहिती भ्रमणध्वनी क्रमांकासहीत गोळा करण्यात आली आहे. नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात येऊन अशा केंद्रांवर मतदारांसाठी सोयी, सुविधा पुरविण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाकडून वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम यंत्रावर गेल्या काही निवडणुकांपासून राजकीय पक्षांकडून व विशेषत: विरोधी पक्षांकडून संशय व्यक्त केला जात असल्यामुळे आयोगाने आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्याते ठरविल्याने जुने ईव्हीएम यंत्रे आयोगाने आपल्या ताब्यात घेतले आहेत. नाशिक जिल्ह्णातील नाशिक, दिंडोरी व धुळे या तीन लोकसभा मतदारसंघातील एकूण ४२२८ मतदान केंद्रांचा विचार करता निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांच्या संभाव्य संख्येचा विचार करता दुपटीने म्हणजेच ९,४२२ बॅलेट युनिट देण्याचे ठरविले असून, त्यासाठी ५,४७९ कंट्रोल युनिट मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्णातील अधिकाºयांचे पथक यंत्रे घेण्यासाठी बेंगलोरला रवाना झाले असून, आठ कंटेनरद्वारे प्रचंड पोलीस बंदोबस्तात येत्या एक, दोन दिवसांत यंत्रे दाखल होतील.

वाढीव यंत्रे नंतर मिळणार
नाशिक जिल्ह्णात मतदान केंद्र पुनर्रचनेत २२० केंद्रे नवीन वाढीव तयार करण्यात आली असून, त्याला अद्याप निवडणूक आयोगाने मंजुरी दिलेली नसल्याने ४२२८ या जुन्याच मतदान केंद्रांच्या तुलनेत वाढीव २० टक्क्याच्या प्रमाणात सध्या नवीन ‘ईव्हीएम’ यंत्रे देण्यात आली असून, नवीन मतदान केंद्रांना मंजुरी मिळाल्यानंतर पुन्हा जिल्ह्णासाठी वाढीव यंत्रे देण्यात येणार आहेत. तसेच आयोगाकडून अजूनही ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राची निर्मिती सुरू असल्याने जिल्ह्णाला पुढच्या टप्प्यात व्हीव्हीपॅट देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. १ सप्टेंबर रोजी आयोगाकडून अद्ययावत विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. वाढलेल्या नव मतदारांच्या प्रमाणात मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्यात आली आहे.

Web Title: The district is divided into five thousand five thousand EVMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.