जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:14 IST2021-01-21T04:14:30+5:302021-01-21T04:14:30+5:30

नाशिकला संघ निवड चाचणी लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी, ...

By District Cricket Association | जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे

जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे

नाशिकला संघ निवड चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे खुल्या गटातील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी मंगळवार, दिनांक २६ जानेवारी रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे घेण्यात येणार आहे.

तरी इच्छुक खेळाडूंनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथील कार्यालयात कामकाजाच्या वेळेत- सकाळी ८.३० ते १०.३० व संध्याकाळी ४.०० ते ६.३० पर्यंत २५ जानेवारीपर्यंत चाचणी शुल्कासह आपली नावे नोंदवावीत. नावे नोंदविलेल्या खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह २६ जानेवारीला हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी ९.३० वाजता हजर राहावे. निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकणार आहे.

Web Title: By District Cricket Association