शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालय : घरात घुसून दोघांची हत्त्या करणाऱ्यांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 17:19 IST

न्यायालयाने खूनाच्या गुन्ह्यात प्रविण, आशिश, आतिश या तीघांना दोषी धरत जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावासदेखील आरोपींना भोगावा लागू शकतो.

ठळक मुद्देदंड न भरल्यास ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावासपरिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात महत्वाचे ठरले.

नाशिक : ‘आमच्या घराजवळ थांबू नका’ असे म्हटले म्हणून मनात राग धरून तीघांनी जेलरोडवरील भीमनगर भागात एका सोसायटीच्या सदनिकेत बळजबरीने घूसुन दोघांना लोखंडी पाईपने जबर मारहाण करत त्यांचा खून केला होता. या गुन्ह्याचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी तीघांना जन्मठेप व प्रत्येकी २५ हजारांचा दंड अशी शिक्षा गुरूवारी (दि.२६) सुनावली.जेलरोडवरील संघमित्र हौसिंग सोसायटीत १६ जानेवारी २०१६ साली आरोपी प्रविण उर्फ विठ्ठल प्रकाश आव्हाड (३५), आशिश उर्फ बाळा मच्छिंद्र पगारे ( ३०), आतिश उर्फ काळु शाम पवार (२९) यांनी सुमेध सुनील गुंजाळ याच्या राहत्या घरात बळजबरीने घुसून रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास सुमेध व त्याचा मित्र स्वप्निल शामराव दोंदे यास लोखंडी पाईपने मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत सुमेध व स्वप्निल हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तीघांनी पलायन के ले होते. उपनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भा.दं.वि कलम ३०२/३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक निवांत जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपींविरूध्द सबळ पुरावे गोळा करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या गुन्ह्याच्या सिध्दतेसाठी फिर्यादी, साक्षीदार व पंचांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात महत्वाचे ठरले. सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. एन.जी.निंबाळकर यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली.न्यायालयाने खूनाच्या गुन्ह्यात प्रविण, आशिश, आतिश या तीघांना दोषी धरत जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावासदेखील आरोपींना भोगावा लागू शकतो. या खटल्याप्रकरणी गुन्हा शाबित होण्यासाठी पैरवी अधिकारी हवालदार काशिनाथ गायकवाड यांनीही वेळोवेळी पाठपुरावा केला. या गुन्ह्यात संशयित समाधान उर्फ पप्पू आहिरे, नितीन उर्फ बाबा जगन जाधव या दोघांविरूध्द सबळ पुरावे न आढळून आल्यामुळे न्यायालयाने त्यांची निर्दोेष मुक्तता केली.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयLife Imprisonmentजन्मठेपCourtन्यायालयMurderखून