शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी सणाच्या कालावधीत कार्यालयीन स्वच्छता करून जिल्हा परिषक कर्मचाऱ्यांनी पालटले रेकॉर्ड रुपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 20:29 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही दिवाळी सणाच्या कालावधीत सुट्या न घेता शनिवार व रविवारीही काम करीत अभिलेख वर्गीकरण व व्यवस्थापनाचे काम पूर्ण केल्याने हा बदल दिसून येत आहे

ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्र्रतिसादअभिलेख वर्गीकरण व व्यवस्थापनाचे काम पूर्ण केल्याने हा बदल धूळ खात पडलेल्या फाइलींची धूळ झटकली

नाशिक : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्र्रतिसाद देत कार्यालयीन स्वच्छतेवर भर दिला असून, यापूर्वी अस्ताव्यस्त पडलेल्या गाठोड्यांच्या रेकॉर्डरूमचे रुपडे पूर्णपणे पालटले आहे.जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही दिवाळी सणाच्या कालावधीत सुट्या न घेता शनिवार व रविवारीही काम करीत अभिलेख वर्गीकरण व व्यवस्थापनाचे काम पूर्ण केल्याने हा बदल दिसून  येत आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये गेल्या ३० ते ४० वर्षांपासूनच्या कपाटांच्यावर गाठोडे बांधून ठेवलेल्या फाइल्स पुनर्जीवित झाल्या असून, सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांनी घरातील स्वच्छतेप्रमाणेच कार्यालयातील अभिलेख व इतर साहित्य नीटनेटके ठेवण्यास प्रारंभ केला आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या विभागांमध्ये आतापर्यंत धूळ खात पडलेल्या फाइलींची धूळ झटकली जात असून, त्यांना सुस्थितीत ठेवण्यासोबतच नंबरिंगही करण्यात येत आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी फाइलींचे वर्गीकरण करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत असून, प्रत्येक विभागाचे विभागप्रमुखही फाइल मॅनेजमेंटकडे कटाक्षाने लक्ष देत असल्याने जिल्हा परिषदेच्या रेकॉर्डरूमचा कायापालट झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषद