जिल्हा बॅँकेचा महावितरणलाही धक्का

By Admin | Updated: April 27, 2017 02:00 IST2017-04-27T01:59:52+5:302017-04-27T02:00:00+5:30

नाशिकरोड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने वीज बिलाचा भरणा जमा न केल्याने ग्राहकांनी जिल्हा बॅँकेच्या कोणत्याही शाखेत वीज बिल भरू नये, असे आवाहन केले आहे.

District Bank's Mahavitaran too push | जिल्हा बॅँकेचा महावितरणलाही धक्का

जिल्हा बॅँकेचा महावितरणलाही धक्का

 नाशिकरोड : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने वीज बिलाचा भरणा महावितरणकडे जमा न केल्याने यापुढे ग्राहकांनी जिल्हा बॅँकेच्या कोणत्याही शाखेत वीज बिल भरू नये, असे आवाहन केले आहे.
जिल्हा बॅँक व महावितरण यांच्यात वीज बिल भरणा प्रक्रियेबाबत २०१६ ते २०१९ या कालावधीसाठी करार करण्यात आला आहे. मात्र जिल्हा बॅँकेने वीज बिलापोटी ग्राहकांनी भरलेले पैसे महावितरणच्या बॅँक खात्यात जमाच केले नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा बॅँकेच्या विविध शाखांमध्ये ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केल्याबाबतच्या पावत्या महावितरणकडे दिल्या आहेत. बॅँकेने ही रक्कम महावितरणच्या मुख्यालयाच्या बॅँक खात्यात जमा करणे आवश्यक होते. परंतु जिल्हा बॅँकेने वीज ग्राहकांकडून जमा केलेले पैसे महावितरण मुख्यालयाच्या खात्यात भरलेले नाहीत. (प्रतिनिधी)

Web Title: District Bank's Mahavitaran too push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.