जिल्हा बॅँकेच्या संचालकांची चौकशी गुंडाळली भाजपा सरकारचे कॉँग्रेस-राष्ट्रवादीला अभय
By Admin | Updated: November 18, 2014 00:32 IST2014-11-17T23:44:28+5:302014-11-18T00:32:04+5:30
जिल्हा बॅँकेच्या संचालकांची चौकशी गुंडाळली भाजपा सरकारचे कॉँग्रेस-राष्ट्रवादीला अभय

जिल्हा बॅँकेच्या संचालकांची चौकशी गुंडाळली भाजपा सरकारचे कॉँग्रेस-राष्ट्रवादीला अभय
नाशिक : अनियमितता व गैरव्यवहाराच्या कारणावरून गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची चौकशी थांबविण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतल्याचे वृत्त असून, नव्यानेच सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली असलेल्या संचालकांना दिलेल्या अभयाबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा बॅँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या कारभारात संगणक खरेदी, बॅँकेचे नूतनीकरण, बांधकामे अशी विविध कामे चर्चेत येऊन सहकार खात्याने त्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार चौकशी होऊन अहवालही देण्यात आला, तर या सर्व अनियमितता व गैरव्यवहाराला जबाबदार असलेल्या संचालकांवर नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाहीही सुरू झालेली असताना शासनाने बॅँकेचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विशेष लेखा परीक्षकअरविंद मोरे यांनी लेखा परीक्षण करून बॅँकेच्या संचालकांवर ठपका ठेवला होता. परंतु तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकार खात्याने केलेला फेर लेखा परीक्षण अहवाल फेटाळून लावल्यामुळे जिल्हा बॅँकेच्या संचालकांना काहीसा दिलासा मिळाला होता; परंतु शासनाने संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक मंडळ नेमून संचालकांची धाकधूक कायम ठेवली होती.