जिल्हा बॅँक : राष्ट्रवादी-युतीत धुसफूस
By Admin | Updated: September 4, 2015 00:20 IST2015-09-04T00:19:28+5:302015-09-04T00:20:01+5:30
विरोधाला वाढते बळ, गच्छंतीचे वारे प्रबळ?

जिल्हा बॅँक : राष्ट्रवादी-युतीत धुसफूस
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीला जेमतेम तीन महिन्यांचा कार्यकाळ उलटत नाही तोच विद्यमान पदाधिकाऱ्यांविरोधात व प्रशासनाविरोधात संचालकांमध्ये नाराजी वाढू लागली असून, त्याच्या पहिल्या टप्प्यात येत्या ७ सप्टेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कार्यकारी संचालकांची गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बॅँकेच्या सभागृहात दाखल होण्यापर्यंत अध्यक्षपदाचे दावेदार बदलत होते. अगदी सभागृहात माजी आमदार माणिकराव कोकाटे व माजी संचालक राजेंद्र भोसले यांच्या गटाचे दोन संचालक अपक्ष संचालकांनी तयार केलेल्या तिसऱ्याच गटाला मिळून त्यातून अध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीने बाजी मारली होती. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत कधी नव्हे ते सहा सहा भारतीय जनता पार्टीचे संचालक निवडून आल्याने सहकारातही भाजपाला वरचष्मा मिळण्याची आयतीच संधी चालून आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट या निवडणुकीत रस घेत जिल्हा बॅँकेचा अध्यक्ष हा भाजपाचाच करा, असे आदेश जिल्हा बॅँकेत निवडून आलेले भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, आमदार अपूर्व हिरे तसेच माजी आमदार माणिकराव कोकाटे, अद्वय हिरे, जिल्हा परिषद कृषी सभापती केदा अहेर आदि सहा संचालकांना दिले होते. (पान ७ वर)