शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा व सत्र न्यायालय : पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळणाऱ्या पतीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 17:27 IST

भाजलेल्या अवस्थेत कांताबाई यांना जिल्हा व शासकिय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. येथील जळीत कक्षात कांताबाई यांनी पोलीस उपनिरिक्षक बी.एम.देशमुख यांना मृत्युपुर्व जबाब दिला होता. यानंतर कार्यकारी दंडाधिकारी यांच्यापुढेही जबाब नोंदवून पती जयरामविरुध्द तक्रार दिली होती. उपचारादरम्यान तीचा मृत्यु

ठळक मुद्देपाच वर्षांपुर्वी पंचवटीत घडली होती घटनामृत्युपुर्व दिलेला जबाब सबळ पुरावा

नाशिक : पेठरोड येथील म्हसोबानगर परिसरात २०१६साली आपल्या पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत अंगावर पेट्रोल ओतून जीवंत पेटवून दिल्याची घटना घडली होती. या घटनेत जिल्हा व शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान कांताबाई जयराम भोये यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी आरोपी जयराम भोये यास अटक करुन त्याच्याविरुध्द जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यावर शनिवारी (दि.६) अंतीम सुनावणी होऊन जिल्हा न्यायाधीश व्ही.पी.देसाई यांनी भोये यास दोषी धरले. पत्नी कांताबाई यांच्या खूनप्रकरणी त्यास जन्मठेप व पाच हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.म्हसोबानगरमध्ये राहणाऱ्या भोये दाम्पत्य यांचा दुसरा विवाह होता. मयत कांताबाई यांना पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला कन्यारत्न प्राप्त झाल्याने २४ जानेवारी २०१६ साली कांताबाई या त्या कन्येला बघण्यासाठी गंजमाळ येथे त्या मुलाच्या घरी गेल्या होत्या. तेथून म्हसोबानगर येथे परतल्यानंतर आरोपी जयराम याने ह्यतुझ्या मुलांचे लग्न झाले आहे, आता तु त्यांच्याकडे जावयाचे नाही,ह्ण असे सांगत आरडाओरड करुन शिवीगाळ करत ह्यतु मला न विचारता त्यांच्याकडे का गेलीह्ण असा जाब विचारून हाताच्या चापटीने मारहाण केली होती. तसेच मयत कांताबाई यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवंत जाळत ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. भाजलेल्या अवस्थेत कांताबाई यांना जिल्हा व शासकिय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. येथील जळीत कक्षात कांताबाई यांनी पोलीस उपनिरिक्षक बी.एम.देशमुख यांना मृत्युपुर्व जबाब दिला होता. यानंतर कार्यकारी दंडाधिकारी यांच्यापुढेही जबाब नोंदवून पती जयरामविरुध्द तक्रार दिली होती. उपचारादरम्यान तीचा मृत्यु झाल्याने जयरामविरुध्द पंचवटी पोलीस ठाण्यात पत्नीला जीवे ठार मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरिक्षक व्ही.डी.श्रीमनवार, पालकर यांनी करत जयरामविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.मृत्युपुर्व दिलेला जबाब सबळ पुरावायावर सुनावणी सुरु होती. अंतीम सुनावणी शनिवारी देसाई यांच्या न्यायालयात झाली. यावेळी सरकारी पक्षाकडून अभियोक्ता ॲड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी बाजू मांडली. न्यायालयात एकुण १२ साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात मयत कांताबाई यांनी मृत्युपुर्व दिलेला जबाब हा न्यायालयाने ग्राह्य धरला. जयरामविरुध्द हा सबळ पुरावा ठरला. या पुराव्याच्यअधारे न्यायालयाने जयराम यास पत्नी कांताबाईच्या खूनाच्या गुन्ह्यात दोषी धरले.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयPoliceपोलिसLife Imprisonmentजन्मठेप