यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्काराचे सोमवारी वितरण
By Admin | Updated: November 25, 2015 23:45 IST2015-11-25T23:44:49+5:302015-11-25T23:45:33+5:30
यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्काराचे सोमवारी वितरण

यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्काराचे सोमवारी वितरण
नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने देण्यात येणारा कला क्षेत्रातील यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार नाशिकचे पं. मकरंद हिंगणे यांना जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण सोमवारी (दि. ३०) नाशिकमध्ये होणार आहे.
प्रतिष्ठानचे नाशिक विभागाचे सरचिटणीस अॅड. विलास लोणारी यांनी ही माहिती दिली. शहरातील रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी चार वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)