वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांचे वितरण

By Admin | Updated: July 4, 2014 00:12 IST2014-07-03T22:16:39+5:302014-07-04T00:12:45+5:30

वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांचे वितरण

Distribution of Vasantrao Naik Agricultural Award | वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांचे वितरण

वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांचे वितरण

 

नाशिक : पावसाने ओढ दिली असली तरी शेतकऱ्यांनी दुष्काळसदृश्य परिस्थितीने खचून न जाता समस्येला तोंड देण्यासाठी उभे रहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे कृषी दिनानिमित्त कै. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल, वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बी. आर. बारवाले आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपमुख्यंमत्री पवार यांच्या हस्ते राज्यात कृषी उत्पादन निर्यात क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल शेतकऱ्यांना वसंतराव नाईक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोठुरे येथील जगन्नाथ खापरे यांचाही समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: Distribution of Vasantrao Naik Agricultural Award