जायगाव येथे कृषी विभागाकडून बियाणे वाटप
By Admin | Updated: November 6, 2015 23:19 IST2015-11-06T23:18:37+5:302015-11-06T23:19:11+5:30
जायगाव येथे कृषी विभागाकडून बियाणे वाटप

जायगाव येथे कृषी विभागाकडून बियाणे वाटप
नायगाव: सिन्नर तालुक्यातल्या जायगाव येथे कृषी विभागाच्या वैरण विकास कार्यक्रमांतर्गत चाळीस शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारी बियाणे वाटप करण्यात आले. सरपंच नलीनी गिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कृषी सहाय्यक व्ही. पी. मोरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाण्याच्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मोरे यांनी शेतातील माती परिक्षणाचे महत्व व घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. नायगाव परिसरात गेल्या पाच वर्षांपासून सलग दुष्काळ जाणवत असून सध्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे.