छत्रपती फाउण्डेशनतर्फे मोसम गौरव पुरस्कारांच ेवितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:45 IST2020-02-24T00:20:29+5:302020-02-24T00:45:10+5:30
उत्राणे येथील छत्रपती शिवाजी फाउण्डेशनतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्यांना मोसम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उत्राणे येथील छत्रपती शिवाजी फाऊंडेशनच्या मोसम पुरस्कार वितरणप्रसंगी उपस्थित राजेंद्र दिघे, कारभारी पगार, आनंद पगार, योगेश पगार आदी.
नामपूर : उत्राणे येथील छत्रपती शिवाजी फाउण्डेशनतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्यांना मोसम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी राजेंद्र दिघे, सरपंच कारभारी पगार, पंचायत समिती सदस्य बाळा महाजन, आनंद पगार,भामेश्वर मंडळाचे शिवदास निकम आदी मान्यवर व्यासपीठावर होते. प्रास्ताविक अध्यक्ष योगेश पगार यांनी केले. पूनम बेडसे यांनी सूत्रसंचालन केले. भूषण पगार, निवृत्ती पगार, दिगंबर पगार, मोहन कापडणीस, तुषार अिहरे,अभिमन पगार, प्रशांत पगार, शुभम धोंडगे आदींनी परिश्रम घेतले.
मोसम गौरव पुरस्कारार्थी
सुधाकर पगार (आदर्श शेतकरी, श्रीपुरवडे), नयन पुजारी (सामाजिक, पुणे), हर्षल पवार (युवा उद्योजक, सौंदाणे). छत्रपती शिवाजी गौरव पुरस्कार : हेमंत पगार, विजय पगार, राजेंद्र भामरे, आकाश पगार, रोहिदास अहिरे, कैलास चौधरी, जनार्दन पगार.