पाथरे येथील ग्रामपंचायतीमध्ये सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:15 IST2021-04-02T04:15:10+5:302021-04-02T04:15:10+5:30

माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश सूर्यभान गडाख यांनी जवळपास २ हजार लिटर सॅनिटायझरचे वाटप ग्रामपंचायतीमार्फत केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ...

Distribution of Sanitizer in Gram Panchayat at Pathre | पाथरे येथील ग्रामपंचायतीमध्ये सॅनिटायझरचे वाटप

पाथरे येथील ग्रामपंचायतीमध्ये सॅनिटायझरचे वाटप

माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश सूर्यभान गडाख यांनी जवळपास २ हजार लिटर सॅनिटायझरचे वाटप ग्रामपंचायतीमार्फत केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, कोळगावमाळ येथील ग्रामपंचायत परिसरातील प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे सामाजिक बांधिलकी जपत वाटप गडाख यांनी केले. यावेळी गडाख यांनी या काळात घाबरून न जाता काळजी घ्यावी, तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करावा, असे मार्गदर्शन केले. गडाख यांच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले. यावेळी पाथरे बुद्रुक, खुर्द, वारेगाव, कोळगावमाळ येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळी- ०१ पाथरे

पाथरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीकडे सॅनिटायझर सुपूर्द करताना राजेश गडाख. समवेत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ.

===Photopath===

010421\01nsk_30_01042021_13.jpg

===Caption===

पाथरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीकडे सॅनिटायझर सुपूर्द करतांना राजेश गडाख. समवेत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ.

Web Title: Distribution of Sanitizer in Gram Panchayat at Pathre