दिव्यांग बांधवांना रेशन किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST2021-07-16T04:12:10+5:302021-07-16T04:12:10+5:30
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी १००, तर शहरी भागात १७ असे एकूण १७० गरजू अपंग बांधवांना रेशन किट वाटण्यात ...

दिव्यांग बांधवांना रेशन किटचे वाटप
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी १००, तर शहरी भागात १७ असे एकूण १७० गरजू अपंग बांधवांना रेशन किट वाटण्यात आले. नाशिक येथे शिंगाडा तलाव येथे झालेल्या जीवनावश्यक साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपंग साधना संघ संस्थेचे संस्थापक श्रीराम पाटणकर होते. यावेळी जेसीआय चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष ललित बोकाडिया, राहुल पवार, हिरे, डॉ. युवराज शहा, मच्छिंद्र मोरे आदींच्या हस्ते दिव्यांग बांधव व भगिनींना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विजयकुमार गांगुर्डे, दीपक भोये, दीपक शेवाळे, दशरथ महाले, विजय मोरे, जोपळे, रमेश वाडेकर, सविता जाधव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
-----------------------
दिव्यांग बांधवांना रेशन किटच्या वाटपप्रसंगी श्रीराम पाटणकर, ललित बोकाडिया, राहुल पवार, हिरे, डॉ. युवराज शहा आदी. (१५ दिंडोरी २)
150721\15nsk_8_15072021_13.jpg
१५ दिंडोरी २