आदिवासी बांधवांना शिधापत्रिकेचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST2021-05-29T04:12:10+5:302021-05-29T04:12:10+5:30

शेणित येथील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून हक्काच्या शिधापत्रिकांपासून वंचित असल्यामुळे त्यांना स्वस्त धान्य मिळत नव्हते. ही बाब ...

Distribution of ration cards to tribal brothers | आदिवासी बांधवांना शिधापत्रिकेचे वाटप

आदिवासी बांधवांना शिधापत्रिकेचे वाटप

शेणित येथील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून हक्काच्या शिधापत्रिकांपासून वंचित असल्यामुळे त्यांना स्वस्त धान्य मिळत नव्हते. ही बाब राष्ट्रवादीचे युवा नेते विजय जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी आमदार माणिकराव कोकाटे व पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आदिवासी बांधवांच्या समस्या मांडल्या. त्यांच्या मागणीची दखल घेत तातडीने शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.

कोरोना संकटकाळात शासनाच्यावतीने स्वस्त धान्य दुकानात मोफत धान्य वाटपाचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. कोरोनाकाळात शिधापत्रिका व धान्य मिळाल्यामुळे आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रसंगी माजी सरपंच राजू जाधव, ग्रामपंचायत सदस्य शरद तेलोरे, रवींद्र पवार आदींसह आदिवासी बांधव उपस्थित होते.

फोटो - २८ नांदूर शिधापत्रिका

शेणित येथील आदिवासी बांधवांना शिधापत्रिकांचे वाटप करतांना राष्ट्रवादीचे विजय जाधव. समवेत माजी सरपंच राजू जाधव, रवींद्र पवार व आदिवासी बांधव.

===Photopath===

280521\28nsk_19_28052021_13.jpg

===Caption===

शेणित येथील आदिवासी बांधवांना शिधापत्रिकांचे वाटप करतांना राष्ट्रवादीचे विजय जाधव. समवेत माजी सरपंच राजू जाधव, रविंद्र पवार व आदिवासी बांधव.

Web Title: Distribution of ration cards to tribal brothers