विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:11 IST2019-09-12T00:10:58+5:302019-09-12T00:11:28+5:30
वैतरणानगर : येथील ‘एक गाव एक गणपती’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्र म व विविध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर आर. आर. बहिरम, यु. एस. पाटील, एल. जी. गोसावी, महेश मानकर, नितीन गावित, अनिल मोरे, के. जी. शेवगावकर, महानंद माळी, सागर जाधव आदी उपस्थित होते.

वैतरणानगर-सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत द्वितीय क्र मांक मिळवलेल्या वैतरणा शाळेतील विद्यार्थ्याांचा विशेष सत्कार करतांना मंडळाचे पदाधिकारी.
वैतरणानगर : येथील ‘एक गाव एक गणपती’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्र म व विविध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर आर. आर. बहिरम, यु. एस. पाटील, एल. जी. गोसावी, महेश मानकर, नितीन गावित, अनिल मोरे, के. जी. शेवगावकर, महानंद माळी, सागर जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी मंडळाच्या वतीने वैतरणा इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत द्वितीय क्र मांक मिळविल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्र मात महिलांसाठी चमचा लिंबु, संगीत खुर्ची, सुई दोरा, रांगोळी व मैदानी स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना बक्षिस देत मंडळाच्या वतीने गौरवण्यात आले. सुत्रसंचालन अमोल ढेरींगे यांनी तर कार्यक्र म यशस्वितेसाठी राकेश पवार, श्रावण दिवे, धिरज गाडेकर, रविंद्र सगभोर, वैभव लब्धे, गणेश सगभोर, सुरज गाडेकर, संतोष पुंजारा आदींनी परिश्रम घेतले.