कळवण : नाशिक जिल्हा बँकेला सुमारे ८७० कोटींचा निधी कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने वर्ग करण्यात आलेला आहे . याच निधीतून शेतकऱ्यांना पीककर्जाचा पुरवठा करण्याचे निर्देशही जिल्हा बँकांना देण्यात आल्याने ‘महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेला’ आता गती मिळेल तसेच मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग सक्षम असून, तशा उपाययोजना राबविण्यासाठी कृषी विभागाला सूचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी येथे दिली.येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कळवणचे आमदार नितीन पवार व्यासपीठावर उपस्थित होते. भुसे यांनी कळवण तालुक्यातील खते व बियाणे पुरवठ्याची माहिती घेत कळवण खुर्द, भेंडी, बेज येथील पिकांची पाहणी केली. कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ आता शेतकऱ्यांना घरबसल्या आॅनलाईन घेता येणार आहे, यासाठी एकच नमुन्यातील अर्ज राहणार असून या आॅनलाईन प्रक्रि येमुळे सर्व योजनांमध्ये पारदर्शीपणा येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी सुनिल पाटील, कौतिक पगार, संजीव पडवळ उपस्थित होते़-----------------खतांचा तुटवडा जाणवणार नाहीज्या शेतकरी बांधवांचे सोयाबीन बियाण्यांच्या माध्यमातून नुकसान झाले त्यांना कसा लाभ देता येईल, त्यासाठी शासन विचार करीत आहे. मागणीप्रमाणे रासायनिक खते, युरिया आणि इतर खतांची उपलब्धता केली आहे, मात्र कोरोनामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली तर खतांचा पुरवठा थोडा उशिरा होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून ५० हजार मेट्रीक टनाचा बफर स्टॉक कृषी विभागाकडे ठेवण्याचा निर्णय झाला असल्याचे भुसे यांनी सांगितले.
जिल्हा बॅँकेला दिलेल्या निधीतून पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:22 IST