हनुमान जयंती निमित्त ऑक्सिजन सिलिंडरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:16 IST2021-04-28T04:16:14+5:302021-04-28T04:16:14+5:30
सिडकोसह परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, रुग्णांचा ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागत आहे. अशा परिस्थितीत आपणही समाजाचे ...

हनुमान जयंती निमित्त ऑक्सिजन सिलिंडरचे वाटप
सिडकोसह परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, रुग्णांचा ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागत आहे. अशा परिस्थितीत आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत, सिडको प्रभाग क्रमांक २७ मधील लोकनेता प्रतिष्ठान, श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ यांच्या वतीने यंदाच्या वर्षीही हनुमान जन्मोत्सव साजरा करताना, ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे, अशा रुग्णांना घरपोच जाऊन त्यांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्याचे काम करण्यात आले.
कोट===
सिडको प्रभाग क्रमांक २७ मधील संभाजी क्रीडा संकुलात महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना जेवण मिळत नसल्याने, याबाबत पाठपुरावा करून रुग्णाला जेवण देण्याची व्यवस्था करून दिली, तसेच काही रुग्णांना ऑक्सिजन गरज असल्याने त्यांना ऑक्सिजन दिले. यापुढील काळातही सामाजिक कार्य सुरूच ठेवणार.
- गोविंद घुगे