शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात खत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 00:18 IST

सायखेडा : खते उपलब्ध झाल्याचे समजताच शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली, त्यानंतर शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याने अखेर पोलिसांना पाचारण करीत त्यांच्या उपस्थितीत खतांचे वाटप सायखेडा येथे करण्यात आले.

ठळक मुद्देसायखेडा येथे खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैराण

सायखेडा : खते उपलब्ध झाल्याचे समजताच शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली, त्यानंतर शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याने अखेर पोलिसांना पाचारण करीत त्यांच्या उपस्थितीत खतांचे वाटप सायखेडा येथे करण्यात आले.अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना पिकांसाठी लागणारी रासायनिक खते मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पीक जोमाने वाढत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना सायखेडा येथील मनीषा एजन्सीमध्ये डीएपी आणि १०:२६:२६ हे खत उपलब्ध झाले असून खत आल्याची बातमी गोदाकाठ भागात वाऱ्यासारखी पसरली अनेक महिन्यांनी खत आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, पिकांना जीवदान मिळेल, अशी अपेक्षा ठेवून शेतकरी खत खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. मात्र अनेक दिवसांपासून खते नसल्याने शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. शेतकऱ्यांची गर्दी वाढत चालली, खतांच्या गोण्या कमी पडतील, असा अंदाज झाल्यावर शेतकरी एकमेकांना ढकलत होते. दुकानदाराने तत्काळ सायखेडा पोलिसांना कळवले. अखेर साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. बी. काद्री यांनी दुकान परिसरात बंदोबस्त लावून शेतकऱ्यांना प्रत्येकी एका गोणीचे वाटप करण्यात आले.मागील काही महिन्यांपासून शेती पिकांसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचा मोठा तुटवडा आला आहे. दुकानदारांकडे खते येत नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना कशाची मात्रा द्यावी, असा प्रश्न भेडसावत आहे.सध्या कांदा आणि द्राक्ष, गहू, भाजीपाला या रब्बी हंगामातील पिकांची लागवड झाली असल्यामुळे या पिकांच्या जोमदार वाढीसाठी खते आवश्यक आहेत. केवळ सेंद्रिय खते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मात्र जमिनीला रासायनिक खतांची सवय झाली आहे आणि पिकाची तत्काळ जोमदार वाढ होण्यासाठी रासायनिक खतांची गरज आहे. पण ते वेळेत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.शासन रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहे. वारंवार खतांच्या सबसिडी कमी करणे, खतांवरील कर वाढवणे, भाडेवाढ करणे, असे प्रकार होत असल्याने खत मिळत नाही, असा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे, शासन शेतकऱ्यांना खते पुरवू शकत नाही, तेव्हा बाजारभाव दुप्पट कसे करणार, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिस