पोषण आहार धान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:10 IST2020-04-09T22:52:43+5:302020-04-09T23:10:53+5:30

वायगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना पोषण आहाराच्या धान्याचे वितरण करण्यात आले.

Distribution of nutritious food grains | पोषण आहार धान्याचे वाटप

पोषण आहार धान्याचे वाटप

औंदाणे : बागलाण तालुक्यातील वायगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना पोषण आहाराच्या धान्याचे वितरण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी धान्य घेण्यासाठी पालकांना बोलावून त्या सर्वांना एक मीटरच्या अंतरावर उभे करून धान्याचे वितरण करण्यात आले. वायगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहाराची तपासणी करताना गटशिक्षणाधिकारी डी. के. घोंगडे, केंद्रप्रमुख डी. जे. काकळीज, वामन खैरनार आदी. यावेळी गटशिक्षणाधिकारी डी. के. घोगंडे केंद्रप्रमुख डीजे काकळीज, सरपंच अशोक अहिरे, पोषण आहार समन्व्यक वामन खैरनार, व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान देवरे, योगेश अहिरे, मुख्याध्यापक बाळासाहेब कापडणीस सुभाष शिवदे, प्रवीण सावंत रमेश सावंत, सुभाष कोर आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळत पालकांना धान्याचे वितरण केले.

Web Title: Distribution of nutritious food grains