कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:56+5:302021-02-05T05:39:56+5:30

जेलरोड, राजराजेश्वरी मंगल कार्यालयात फेडरेशनतर्फे कंत्राटी कामगारांसाठी नुकतेच मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते ...

Distribution of materials to contract power workers | कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप

जेलरोड, राजराजेश्वरी मंगल कार्यालयात फेडरेशनतर्फे कंत्राटी कामगारांसाठी नुकतेच मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते व्ही. डी. धनवटे, कार्यकारी अभियंता तपासे, उपमुख्य अधिकारी राजे भोसले, विकास आडे, महेश कदम, अतुल आगळे, एस. आर. खतीब, पंडितराव कुमावत, दीपक गांगुर्डे, मधुकर जाधव, प्राची पाटील, दीपाली मोरे, दिलीप घोडे, पोपटराव पेखळे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कंत्राटी कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना व्ही. डी. धनवटे म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या प्रगतीसाठी संघटना वेळोवेळी मदत करीत आहे. मुख्य कार्यालय पातळीवर कामगारांना दर्जेदार साहित्य उपलब्ध झाले पाहिजे. धोकादायक लाइन्सची दुरुस्ती झाली पाहिजे, तसेच समान काम समान वेतन या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. प्रास्ताविक महेश कदम यांनी केले. आभार अतुल आगळे यांनी मानले. यावेळी सतीश पाटील, एस. आय. खान, भास्कर सातव , रघुनाथ ताजनपुरे, बाळासाहेब गोसावी, सुरेश उगले, सुनील मालुंजकर, दत्ता चौधरी, भास्कर लांडगे, अनिल नागे, ज्ञानेश्वर बोराडे, चंद्रकांत जाधव, पंडित डोळस, तुषार जाधव, जयेश तांबोळी, प्रवीण अहिरे, दिलीप पाटील, रामदास मोरे आदी उपस्थित होते. (फोटो ०२ वीज)

Web Title: Distribution of materials to contract power workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.