दिव्यांगांना योजना लाभाच्या पत्रांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:16 IST2019-03-05T00:16:00+5:302019-03-05T00:16:14+5:30

दिंडोरी : येथील पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील दिव्यांग गरजू लाभार्थींना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने पाच टक्के राखीव निधीअंतर्गत घरकुल व अन्य योजनांच्या मंजुरीचे पत्र वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमसाठी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर उपस्थित होत्या.

Distribution of letters of benefit plan to Divyangas | दिव्यांगांना योजना लाभाच्या पत्रांचे वितरण

दिव्यांगांना योजना लाभाच्या पत्रांचे वितरण

ठळक मुद्दे दिव्यांग कक्षाचे उद्घाटन

दिंडोरी येथील पंचायत समितीत गरजू दिव्यांग लाभार्थींना घरकुल योजनेच्या अंमलबजावणीचे पत्र वितरण करताना सभापती सुनीता चारोस्कर. समवेत मच्छिंद्र मोरे, प्रहारचे तालुकाप्रमुख सुकदेव खुर्दळ आदींसह दिव्यांग बांधव.

दिंडोरी : येथील पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील दिव्यांग गरजू लाभार्थींना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने पाच टक्के राखीव निधीअंतर्गत घरकुल व अन्य योजनांच्या मंजुरीचे पत्र वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमसाठी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर उपस्थित होत्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के राखीव निधीअंतर्गत गरजू लाभार्र्थींना घरकुल ,कल्याणकारी योजनांचे मंजुरी पत्र वितरण व दिव्यांग कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित दिव्यांग मेळाव्याप्रसंगी माजी उपसभापती वसंत थेटे, सुकदेव खुर्दळ, मच्छिंद्र मोरे, मीना पठाण आदींनी दिव्यांगाना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर एकनाथ गायकवाड, संगीता घिसाडे, विठ्ठलराव आपसुंदे, गुलाब जाधव, सतीश पाटील, बापू चव्हाण, माणिक मौले, पुंडलिक गायकवाड, दीपक भोये आदी उपस्थित होते. प्रास्ताविक गोपाळ यांनी केले.

Web Title: Distribution of letters of benefit plan to Divyangas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार