विविध दाखल्यांचे कुष्ठपीडितांना वाटप

By Admin | Updated: July 3, 2014 00:08 IST2014-07-02T22:07:55+5:302014-07-03T00:08:40+5:30

विविध दाखल्यांचे कुष्ठपीडितांना वाटप

Distribution of leprosy of various illustrations | विविध दाखल्यांचे कुष्ठपीडितांना वाटप

विविध दाखल्यांचे कुष्ठपीडितांना वाटप

 

पंचवटी : पंचवटीतील वाल्मीकनगर येथील कुष्ठपीडित सामाजिक बहुद्देशीय सेवा संस्थेचा दुसरा वर्धापनदिन कुष्ठ वसाहत श्रीराम मंदिर येथे साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग नगरसेवक समाधान जाधव, संस्थेचे अध्यक्ष हेमंत शेट्टी आदिंसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगरसेवक रूपाली गावंड यांनी भूषविले.
कुष्ठपीडित संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सुरुवातीला कुष्ठपीडित बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर एस.टी. बस सवलतीचे पास, दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका, राजीव गांधी जीवनदायी योजनेचे कार्ड, तसेच कुष्ठरुग्णांना अपंगत्वाचे दाखले यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचे उपाध्यक्ष रमेश ढोले, संघटनेचे निमंत्रक हरीश म्हात्रे, सदस्य भालचंद्र निरभवणे, छबूनाना गावंड, कृष्णा वानखेडे, प्रकाश कदम, हेमंत जयकर, गोपाळ गोसावी, विजय हाटकर आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मनोज पिंपळसे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Distribution of leprosy of various illustrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.