शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

खान्देश रत्न पुरस्काराचे वितरण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:11 IST

खान्देशात जन्मलेल्या व स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवाय आपल्या मातीशी व माणसांशी नाळ जोडून ठेवलेल्या पंधरा मान्यवरांना खान्देश रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सिडको : खान्देशात जन्मलेल्या व स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवाय आपल्या मातीशी व माणसांशी नाळ जोडून ठेवलेल्या पंधरा मान्यवरांना खान्देश रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  नाशिकशी प्रादेशिक सलगता विचारात घेऊन संस्कृती आणि भाषेच्या संवर्धनासाठी सुरू असलेला हा महोत्सव सातत्याने सुरूच ठेवावा, असे मत उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाचे माजी कुलगुरू कृष्णा पाटील यांनी व्यक्त केले.आमदार सीमा हिरे यांच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे मायेच्या माणसांचा उत्सव खान्देश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.२२) विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करून खान्देशच्या नावलौकिकात भर घालणाºया खान्देश रत्न पुरस्कार्थींचा गौरव माजी कुलगुरू कृष्णा पाटील, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा, के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या संचालक शकुंतला वाघ, आमदार चंदुभाई पटेल, आमदार सीमा हिरे, महेश हिरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना कृष्णा पाटील यांनी. या खान्देश महोत्सवामुळे माहेरची माणसे एकत्र आली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.संस्कृती, भाषेचा विचार केला तर नाशिकचा मोठा हिस्सा अहिराणी भाषेत आहे. या महोत्सवामुळे पूर्वीच्या सर्व गोष्टींचे स्मरण होत आहे. यापुढील काळातही महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृतीचा जागर सुरूच ठेवावा, असेही पाटील यांनी सांगितले. आमदार सीमा हिरे म्हणाल्या जळगाव, नंदूरबारसह कसमादे भागातील नागरिक नाशिकमध्ये स्थायिक झाले असून, त्यांना एकत्र करून मायेच्या माणसांचा उत्सव साजरा करण्याची संकल्पना आली.बहिणाबाई चौधरी यांनी दिलेले संस्कृती जतन करण्याचे काम खान्देश महोत्सवाच्या माध्यमातून यापुढील काळातही सुरू ठेवणार असल्याचेही हिरे यांनी सांगितले. लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. आभार रश्मी हिरे यांनी मानले.खान्देश रत्न  पुरस्काराचे मानकरीराजेंद्र शंकर कलाल, विलास नीळकंठ पाटील, सतीश यादवराव सोनवणे, रेखा महाजन, प्रशांत निंबाजी पाटील, बाळासाहेब विनायकराव पाटील, प्रशांत श्यामकांत कुलकर्णी, डी. एल. देवरे, अनिल दयाराम जाधव, नागराज देवरे, श्यामदत्त विभांडिक, नितीन वसंतराव ठाकरे, गंगाराम सावळे, कौतिक रामचंद्र जाधव, विवेक पाटील यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक