आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:56 IST2017-09-11T00:56:23+5:302017-09-11T00:56:40+5:30

लायन्स क्लब आॅफ नाशिक डिस्ट्रीक्ट ३२३४ डी २ नाशिक रिजनच्या वतीने शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा सभागृहात आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील १३ लायन्स क्लबने एकत्र येत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Distribution of the ideal teacher award | आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

नाशिक : लायन्स क्लब आॅफ नाशिक डिस्ट्रीक्ट ३२३४ डी २ नाशिक रिजनच्या वतीने शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा सभागृहात आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील १३ लायन्स क्लबने एकत्र येत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात वैद्यकीय, विज्ञान, वाणिज्य, कला आणि क्रीडा या क्षेत्रांतील शिक्षकांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ. रवींद्र भवरे, डॉ. ख्रिस्तीबेन सुझायसन, डॉ. वसंत वाघ, डॉ. वर्षा भालेराव, डॉ. अजय भुसरेड्डी, तृप्ती जाधव, यशवंत देशमुख, शालिनी बोरसे, वैशाली सोनवणे, गणेश सुर्यवंशी, राजेंद्र पितृभक्त, विष्णू पोटिंदे, नामदेव कचरे, निर्मला अष्टपुत्रे, कुसुम बुरकूले, संगीता पाटील, पंकज दशपुत्रे, शरद वडजे, शुभांगी बेलगावकर, वर्षा देशमुख, संपत जोंधळे, राजेंद्र पाटील, मधुकर काकळीज, कविता देवकर, शशिकांत अमृतकार, संजय कोठावदे, पंकज पवार, दिलीप केल्हे, राजश्री उन्नीयन, यशवंत जाधव, मनोहर कुलकर्णी, आनंद तांबट, स्नेहलता पवार, ललिता शर्मा, मनीषा कुलकर्णी, रमेश जाधव आदी शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर लायन जयंत येवला, अजय अहुजा, सचिन शाह, विनोद कपूर, राजेंद्र मजेठिया, दिवाकर रत्नपारखी आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of the ideal teacher award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.