निफाड तालुक्यातील गरजू कुटूंबांना किराणा किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 08:05 PM2020-04-18T20:05:26+5:302020-04-19T00:46:48+5:30

निफाड : कोरोना आजार पसरू नये म्हणून देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे कष्टकरी मजूरवर्गात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिवारासाठी मदत करणे कर्तव्य असल्याने गरजू कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.

 Distribution of groceries to needy families in Niphad taluka | निफाड तालुक्यातील गरजू कुटूंबांना किराणा किटचे वाटप

निफाड तालुक्यातील गरजू कुटूंबांना किराणा किटचे वाटप

Next

निफाड : कोरोना आजार पसरू नये म्हणून देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे कष्टकरी मजूरवर्गात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिवारासाठी मदत करणे कर्तव्य असल्याने गरजू कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.
निफाडचे नगरसेवक किरण कापसे यांनी गरजू कुटुंबाला किराणा किटचे वाटप केले. शिवाय आपल्या शेतात काढलेला १० पोते गहू लासलगाव येथील जय जनार्दन अनाथाश्रमाला भेट दिला आहे. निफाडमधील गरजू कुटुंबांची यादी तयार करून त्यांना आणि निफाड येथील स्वयंवर मंगल कार्यालय येथे थांबलेल्या परप्रांतीय मजुरांना निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, किरण कापसे यांच्या हस्ते या किराणा किटचे वाटप करण्यात आले.
हा उपक्र म उपक्र म यशस्वी करण्यासाठी विक्र म रंधवे, बापू कापसे, तुकाराम उगले, प्रथमेश कापसे, रावसाहेब कुंदे यांचे सहकार्य लाभले. निफाडमधील गरजू नागरिकांना सदर किराणा किटचे यापुढे वाटप चालू राहणार असल्याचे कापसे यांनी सांगितले.

Web Title:  Distribution of groceries to needy families in Niphad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक