शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

‘ग्रेपसिटी गौरव’ पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:34 AM

जेसीआय संस्थेच्या वतीने ‘जेस्सी वीक-२०१९’च्या समारोपप्रसंगी आयोजित सोहळ्यात ग्रेपसिटी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी शहरातील शैक्षणिक, सामाजिक, कला आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान करण्यात आला.

नाशिक : जेसीआय संस्थेच्या वतीने ‘जेस्सी वीक-२०१९’च्या समारोपप्रसंगी आयोजित सोहळ्यात ग्रेपसिटी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी शहरातील शैक्षणिक, सामाजिक, कला आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान करण्यात आला.जेसीआय ग्रेपसिटी व क्विन्स यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूररोडवरील शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात रविवारी (दि.२२) पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नवनाथ येवले उपस्थत होते. त्यांच्यासमवेत प्रफुल्ल पारख, प्रशांत पारख, प्रदीप गिरासे, सुप्रिया जैन, सारिका वाघमारे, वैशाली पारख आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, योगगुरू विश्वासराव मंडलिक, शैक्षणिक क्षेत्रासाठी इस्पॅलियर स्कूलचे संचालक सचिन जोशी, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. तापस कुंडू, कला क्षेत्रात गायक मीना परुळेकर-निकम, लोकमतचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी जैन, पारख यांनी जेसी वीकमध्ये करण्यात आलेली विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा सादर केला.पुरस्कारार्थी मंडलिक यांनीही आपले मनोगत व्यक्त करत सामाजिक जीवनात योगाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. जोशी यांनी शैक्षणिक व्यवस्थेतील बदलाची गरज याविषयी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. पंकज जैन यांनी केले. सूत्रसंचालन अजय चव्हाण यांनी केले व आभार पराग घारपुरे यांनी मानले. यावेळी जेसीआय ग्रेपसिटीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक