ग्रेपसिटी गौरव पुरस्कारांचे वितरण
By Admin | Updated: September 27, 2014 00:56 IST2014-09-27T00:30:59+5:302014-09-27T00:56:23+5:30
धर्माधिकारी, पारख, बोडखे, दुसानिस सन्मानित

ग्रेपसिटी गौरव पुरस्कारांचे वितरण
नाशिक : जेसीआय ग्रेपसिटीच्या वतीने आयोजित ग्रेपसिटी फेस्टिव्हल अंतर्गत गौरव पुरस्कारांचे वितरण स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे क्षेत्रीय महाप्रबंधक बाबुलाल बंब यांच्या हस्ते करण्यात आले.
जेसीआय ग्रेपसिटीच्या वतीने हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, युवा परिवर्तन या संस्थेमार्फत प्रवीण बोडखे, ‘तू तिथे मी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेची अभिनेत्री मृणाल दुसानिस, व्यावसायिक शशिकांत पारख यांना ग्रेपसिटी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी ग्रेपसिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल पारख व संजय काठे उपस्थित होते. जेसी सप्ताह चेअरमन पराग जोशी यांनी उपक्रमांचा अहवाल सादर केला. समृद्धी वाघमारे हिने प्रार्थना म्हटली. अध्यक्ष डॉ. पंकज जैन यांनी सूत्रसंचालन केले. मुकेश गुप्ता यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)