वखरणी येथे शिधापत्रिकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 13:26 IST2020-03-03T13:26:15+5:302020-03-03T13:26:52+5:30
पाटोदा : आपल्या न्यायहक्कासाठी वारंवार सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवूनही काम होत नसल्याने ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ याचा अनुभव अनेकांना येत असल्याने नको ते काम असे म्हणण्याची वेळ येते. मात्र, येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारु ळे व नायब तहसीलदार प्रकाश बुरु ंगुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विखरणी गावात महा राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या माध्यमातून सुमारे अडीचशे कुटुंबांना नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.

विखरणी येथे महा राजस्व अभियानांतर्गत शिधापत्रिकांचे वाटप करताना प्रकाश बुरु ंगळे, रमेश खैरे, मोहन शेलार, रामदास खुरसणे, बाबा डांगे, चेतन मोकळ आदी.
अध्यक्षस्थानी येवला पंचायत समितीचे गटनेते मोहन शेलार होते. मंडल अधिकारी रमेश खैरे, तलाठी विजय भदाणे, सेतू संचालक बाबा डांगे, चेतन मोकळ, ग्रामसेवक गोपीचंद खैरे, सरपंच रामदास खुरसणे, उपसरपंच मंगल शेलार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्र मास सोपान पगार, दौलत शेलार, परशराम गोडसे, परशराम शेलार, भागवत शेलार, भास्कर शेलार, साहेबराव बिडगर, भीमा खरे, प्रकाश पगार, सुखदेव शेलार, शांताराम खरे आदी उपस्थित होते. नामदेव पगार यांनी सूत्रसंचालन केले. अशोक बंदरे यांनी आभार मानले.
कोट
वयाची साठी पार झाली, सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजविली. मात्र, दरवेळेस काहीना काही कागदपत्र कमी पडत असल्याने शिधापत्रिका मिळत नव्हती. शिधापत्रिकेअभावी शासनाच्या कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नव्हता. आता गावातच रेशनकार्ड मिळाल्याने अत्यानंद झाला आहे.
-श्रावण खुरसणे, लाभार्थी
--
येवला तालुक्यात आजही शेकडो कुटुंबे शिधापत्रिकेपासून वंचित असल्याने त्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. ग्रामीण भागातील आदिवासी व कष्टकरी समाजाला शिधापत्रिका व विविध शासकीय दाखले वितरणाचे काम राजस्व अभियानाच्या माध्यमातून केले जात असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
- प्रकाश बुरु ंगुळे, नायब तहसीलदार