येवल्यात भाजयुमोकडून आरोग्य तपासणीसह धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:11 IST2021-06-03T04:11:18+5:302021-06-03T04:11:18+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त ‘सेवा ही संघटन’ कार्यक्रमांतर्गत सदर उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे ...

Distribution of foodgrains along with health check-up from BJP in Yeola | येवल्यात भाजयुमोकडून आरोग्य तपासणीसह धान्य वाटप

येवल्यात भाजयुमोकडून आरोग्य तपासणीसह धान्य वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त ‘सेवा ही संघटन’ कार्यक्रमांतर्गत सदर उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे उद्‌घाटन भाजप युवा मोर्चा नाशिक ग्राीण जिल्हाध्यक्ष सचिन दराडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिंदे, तालुकाध्यक्ष डॉ. नंदकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते रमेश भावसार, माजी नगरसेवक सुभाष पहीलवान पाटोळे, संजय पहीलवान कुक्कर, लीलाबाई पेटकर, दिनेश परदेशी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चेतन धसे, विशाल शिखरे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सहस्रार्जुन मंगल कार्यालयात समता ब्लड बँकेच्या सहकार्याने झालेल्या रक्तदान शिबिरात ६१ दात्यांनी रक्तदान केले.

सुभाष पाटोळे, रमेश भावसार व सचिन दराडे यांची प्रसंगोचित भाषणे झाली. प्रास्ताविक आनंद शिंदे यांनी, सूत्रसंचालन गणेश खळेकर यांनी तर आभारप्रदर्शन दिनेश परदेशी यांनी केले.

कार्यक्रमास भारतीय मजदूर संघाचे श्रावण जावळे, युवराज पाटोळे, संतोष नागपुरे, भूषण भावसार, मयूर कायस्थ आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of foodgrains along with health check-up from BJP in Yeola