आदिवासी गरजू बांधवांना धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 23:18 IST2020-04-07T23:18:34+5:302020-04-07T23:18:51+5:30
जगभर कोरोनाने थैमान घातले असताना सर्वच देश लोकडाउनमध्ये आहे. त्यामुळे हातावर कुटुंब असलेल्या इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांची उपासमार होत आहे. त्यांची ही परिस्थिती लक्षात घेता त्यांना एक हात मदतीचा म्हणून माजी जि. प. सदस्य गोरख बोडके व जि. प. सदस्य अनिता बोडके यांनी स्वखर्चाने १ हजार किलो तांदूळ व गव्हाचे प्रत्येक कुटुंबाला पाच किलो असे वाटप केले आहे.

आदिवासी गरजू बांधवांना धान्य वाटप
घोटी : जगभर कोरोनाने थैमान घातले असताना सर्वच देश लोकडाउनमध्ये आहे. त्यामुळे हातावर कुटुंब असलेल्या इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांची उपासमार होत आहे. त्यांची ही परिस्थिती लक्षात घेता त्यांना एक हात मदतीचा म्हणून माजी जि. प. सदस्य गोरख बोडके व जि. प. सदस्य अनिता बोडके यांनी स्वखर्चाने १ हजार किलो तांदूळ व गव्हाचे प्रत्येक कुटुंबाला पाच किलो असे वाटप केले आहे.
आदिवासी भागातील मुख्यत्वे करून गरीब असलेल्या बांधवांना हे धान्य वाटप केले असल्याची माहिती गोरख बोडके यांनी दिली आहे आणि खऱ्या अर्थाने गरजू व गरीब आदिवासी बांधवांना गेल्या दहा दिवसांपासून रोजगार नसल्यामुळे त्यांना घरातच बसण्याची वेळ आली आहे त्यामुळे त्यांना रोजगारदेखील उपलब्ध होत नाही. दोन वेळचे जेवण आपल्या रोजगारावर अवलंबून असलेल्या या आदिवासी बांधवांसाठी बोडके यांनी अन्नदान करून त्यांचा किमान एक महिन्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.