दोडी येथे गरजूंना घरपोच धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 23:05 IST2020-04-07T23:05:13+5:302020-04-07T23:05:40+5:30
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील ब्रह्मानंद फाउण्डेशनने गावातील शंभरहून अधिक गरजू व भूमिहीन कुटुंबांना घरपोच धान्य वाटप केले. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड येथील उद्योगपती दीपक पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्र म राबविण्यात आला. गावातील गरजू कुटुंबाना पाच किलो धान्याचे वाटप करण्यात आले.

दोडीत गरजूंना मोफत धान्य वाटप करताना ब्रह्मानंद फाउण्डेशनचे पदाधिकारी.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील ब्रह्मानंद फाउण्डेशनने गावातील शंभरहून अधिक गरजू व भूमिहीन कुटुंबांना घरपोच धान्य वाटप केले. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड येथील उद्योगपती दीपक पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्र म राबविण्यात आला. गावातील गरजू कुटुंबाना पाच किलो धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउण्डेशनचे अध्यक्ष सुकदेव आव्हाड, उपाध्यक्ष मधुकर कांगणे, सचिव चंद्रभान जाधव, खजिनदार गणपत केदार, पी. डी. विंचू, प्रदीप केदार, जयप्रकाश केदार, रामदास केदार, माधव आव्हाड, बाळासाहेब दराडे, गणेश जाधव आदी उपस्थित होते.