मोहाडीत अन्नधान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:11 IST2021-06-04T04:11:53+5:302021-06-04T04:11:53+5:30

: मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तालुक्यातील मोहाडी येथे भाजपच्या वतीने ‘सेवा ...

Distribution of food grains in Mohadi | मोहाडीत अन्नधान्याचे वाटप

मोहाडीत अन्नधान्याचे वाटप

: मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तालुक्यातील मोहाडी येथे भाजपच्या वतीने ‘सेवा ही संघटन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. भारती पवार उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष केदा आहेर, प्रदेश सचिव बापूसाहेब पाटील, जिल्हा चिटणीस किरण नाईक, तालुका अध्यक्ष नरेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, अमर राजे, नितीन जाधव, उपस्थित होते. याप्रसंगी मोहाडी येथील गरीब कुटुंबातील कुटुंबीयांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशासेविका यांना कोरोना सुरक्षा कवचचे वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेब कळमकर, आबासाहेब पाटील, हर्षल काठे, शरद घुमरे, पंढरीनाथ पिंगळे, केदारनाथ क्षीरसागर, एकनाथ भुजबळ, गणेश क्षीरसागर, आदींसह नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश तिडके यांनी केले तर तालुका अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी आभार मानले.

Web Title: Distribution of food grains in Mohadi