पिंपळगाव घाडगात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 22:47 IST2020-04-03T22:47:09+5:302020-04-03T22:47:31+5:30
जगभरात कोरोना या विषाणूने धुमाकूळ घातला असून, ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्था गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. वाडीवºहे पोलीस ठाण्याच्या वतीनेही ‘एक हात मदतीचा’ या उपक्र मांतर्गत इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सरपंच देवीदास देवगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

वाडीवºहे पोलीस ठाण्याच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना डी. एच. वाजे. समेवत हवालदार कर्डक, देवीदास देवगिरे, रमेश देवगिरे आदी.
नांदूरवैद्य : जगभरात कोरोना या विषाणूने धुमाकूळ घातला असून, ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्था गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. वाडीवºहे पोलीस ठाण्याच्या वतीनेही ‘एक हात मदतीचा’ या उपक्र मांतर्गत इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सरपंच देवीदास देवगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. वाडीवºहेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक डी. एच. वाजे व हवालदार कर्डक यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश देवगिरे, राजू गोडे आदी उपस्थित होते.