केबीएच विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:39 IST2020-12-04T04:39:16+5:302020-12-04T04:39:16+5:30
यावेळी विभागप्रमुख सचिन लिंगायत यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी शासनाच्या दिव्यांगासाठी असलेल्या योजना तसेच शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ...

केबीएच विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप
यावेळी विभागप्रमुख सचिन लिंगायत यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी शासनाच्या दिव्यांगासाठी असलेल्या योजना तसेच शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या साहित्याची माहिती दिली.यात एम.आर.किट, कॅलिपर, ट्रायसिकल श्रवणयंत्र आदी साहित्यांचे वाटप तसेच शासनाने दिलेल्या विविध शिष्यवृत्ती संदर्भात माहिती दिली.
यावेळी राजेश्वर धोंडगे, हर्षल हिरे, योगेश सरनाईक, दीप खैरनार, आयर्न साळुंखे या दिव्यांग विद्यार्थ्यांचा तसेच जेष्ठ शिक्षक एस.एस.पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक एस.एस.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य पवार यांनी मार्गदर्शन केले.. सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले. आभार राजेश धनवट यांनी मानले. यावेळी शशिकांत पवार ,एन.डी.गवळी ,ए.यु.वाघ, बी.पी.सोनवणे ,टी.यु.देवरे, आर.बी.बच्छाव, डी.के. सोनजे ,आर.के.बोरसे, के.वाय.देवरे, व्यंकट मगर, आनंद भालेराव, आशा पगार,एच.एन.सोनवणे,एस.डी.महाले ,के.व्ही.खैरनार आदी शिक्षक उपस्थित होते.